आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निम्मित आयोजित कार्यक्रमात 25 वर्षांवरील सेवा देणाऱ्या संस्थान पैकी एक सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी यांना सन्मानित करताना रत्नागिरी व सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे.
कॅथॉलीक अर्बन को ऑप -क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार ‘ हा मानाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देत कॅथॉलीक अर्बनला सन्मानित करण्यात आले.
अलिबाग येथे विभागीय सह निबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात एकत्रित व्यवसाय गटात कॅथॉलीक अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. -सावंतवाडी या पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते उत्कृष्ठ पतसंस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पतसंस्थेच्या चेअरमन आनमारी डिसोजा, संचालक आगोस्तीन फर्नाडिस, जनरल मॅनेजर जेम्स बोर्जीस, फ्रेंकी डान्टस, फातिमा कार्डोज आदींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम व भारतीय संविधान देऊन हा गौरव करण्यात आले.
सातत्यपूर्ण प्रगती, सहकारातील योगदान आणि गुणवत्ता सिध्दतेमुळे ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार’ हा मानाचा सन्मान कॅथॉलीक अर्बन पतसंस्थेला देण्यात आला.
कोकण विभागातून अनेक अर्ज आल्यामुळे ही निवड प्रक्रिया चुरशीची होती. परंतु यात कॅथॉलीक अर्बनने यश मिळवले आहे. याप्रसंगी राज्य निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे, खासदार धैर्यशील पाटील, मिलिंदसेन भालेराव, निरंजन डावखरे, शैलेश कोतमिरे, प्रमोद जगताप, नंदकुमार चाळके, सोपानराव शिंदे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
गरज तुमची, साथ आमची,
आपुलकीची विश्वासाची…..
CATHOLIC Urban Co-Operative Credit Soc.Ltd. Sawantwadi
For More Details Contacts:
HEAD OFFICE (02363-273890
Sawantwadi: 02363-273889
Vengurla: 02366-262953
Shiroda: 02366-227439
Malvan: 02365-252782
Kankavli: 02367-233922
Kudal: 02362-221559
www.catholicurban.com