Catholic

कॅथॉलिक पथसंस्थेची २५ वर्षांची यशस्वी यशोगाथा

सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली व आपल्या आकांक्षाच्या क्षितिजाला अर्ज देणारी संस्था म्हणजेच कॅथलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हा सावंतवाडी.

कॅथलिक पतसंस्थेची 25 वर्षांची यशस्वी यशोगाथा संस्थेचे संस्थापक श्री पि.एफ.डॉन्टस सैन्यातून रिटायर्ड झाल्यानंतर सहकार खात्यात नोकरीला लागले . १९९४ साली सहकार खात्यात नोकरी करून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या सहकाराचा अनुभव आपल्या ख्रिस्ती समाजाच्या उन्नतीसाठी कसा उपयोग करता येईल याची घोर त्यांच्या मनाला लागली होती. ख्रिश्चन समाज आपला पारंपारिक व्यवसाय शेती मासेमारी यावर उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे मुलांना उच्च शिक्षण देणे शक्य नव्हते. ख्रिश्चन तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करणे अवघड होते . ही आपल्या समाजाची परिस्थिती बदलावी म्हणून सावंतवाडी कॅथलिक असोसिएशन सावंतवाडी यांच्या झालेल्या बैठकीत ख्रिश्चन समाजासाठी पतसंस्था सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव श्री पि.एफ.डॉन्टस यांनी ठेवला. पतसंस्था सुरू केल्यास आपल्या समाजाला त्याचा कसा फायदा होईल हे पटवून दिल्यानंतर सावंतवाडीचे सुपुत्र व त्या वेळेचे मिलाग्रीस चर्च सावंतवाडी चे पॅरिश प्रिस्ट रेव्ह फादर जॉन सालदाना यांनी लोकांपर्यंत ही योजना पोहोचवली बरोबर काही जाणकार व्यक्तींनी पुढाकार दाखवला व फादर जॉन चालताना यांच्या सहकार्याने रुपये ३५००० भांडवल जमा केले . आता पतसंस्था सुरू करण्यासाठी प्रश्न होता तो जागेचा त्यावेळी जुन्या मिलाग्रीस चर्चमागे एक जुनाट खोली होती ती फादरानी वापरण्यास परवानगी दिली आणि दिनांक ६/१०/१९९४ रोजी पुणे धर्म प्रांताचे महाधर्मगुरू मा . विषप व्हेलेरीयन डिसोजा यांनी संस्था आशीर्वादित करून कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हा सावंतवाडी या संस्थेचे उद्घाटन केले त्यावेळी संस्थेचे कार्यक्षेत्र सावंतवाडी तालुक्या पुरतेच मर्यादित होते संस्थेच्या सुरुवातीला सौ रजिना फ्रान्सिस पिंटू यांनी चेअरमन पदी फर्नांडिस व्हाईस चेअरमन व श्री पीटर फ्रान्सिस यांची सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज होती त्यावेळी बँकिंग क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेली कै जॉन डिसोजा(मिलाग्रिस हायस्कूलचे जॉन सर) यांच्या पत्नी श्रीमती जॉन डिसोजा यांची निवड श्री पि.एफ.डॉन्टस यांनी केली. त्यांचे शिक्षण केवळ दहावी पदरी दोन मुले यांना उदरनिर्वाहासाठी मदत होईल याच हेतूने त्यांची निवड करण्यात आली त्यांचे त्या आता मॅनेजर लिपिक व शिपाई अशा तिन्ही भूमिका निबाबत होत्या सीपीएस सरांनी स्वतः संस्थेत बसून त्यांना बँकिंग क्षेत्राचे प्रशिक्षण दिले. तसेच बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर तथा माझी चेअरमन कै. पिटर कार्डोज आणि श्री लॉरेन्स डिसोजा यांनी देखील पतसंस्थेच्या कामकाजात मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक मंडळ होतेच पण त्याचबरोबर काही सल्लागार म्हणून नेमण्यात आले सुरुवातीला सेव्हींग, रिकरिंग आणि फिक्स डिपॉझिट अशा योजना सुरू केल्या आणि कोणाची वाट न बघता सर्वप्रथम संचालक मंडळ आणि सल्लागारांची या तिन्ही योजनेअंतर्गत खाती उघडण्यात आली तसेच प्रत्येकाला आपापल्या परिसरातील लोकांना सभासद करून घेणे व त्यांची सेविंग व ठेव खाती उघडण्याबाबत टार्गेट देण्यात आले. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली संस्थेला आवश्यक ती स्टेशनरी म्हणजे फॉर्म पासबुक वगैरे संचालक मंडळातील काही लोकांनी स्वखर्चाने छापून दिली. सुरुवातीला कॅथलिक संस्था फक्त ख्रिस्ती समाजापुरतीच मर्यादित होती. प्रत्येक रविवारी ख्रिस्ती लोक मोठ्या संख्येने चर्चमध्ये येतात अशा परिस्थितीत संस्थेचे व्यवहार वाढावेत म्हणून सुरुवातीला संस्था रविवारी चालू ठेवून सोमवार साप्ताहिक सुट्टी करण्यात आली संस्थेच्या व्यवहार वाढीच्या दृष्टीने वेळोवेळी संचालक सभा घेण्यात आल्या आणि सभा चहा पान साठी झालेला खर्च संस्थेला न टाकता तो खर्च देखील आजी-माजी संचालक मंडळ स्वखुशीने करीत संस्थेच्या ठेवी वाढण्याच्या दृष्टीने पिग्मी ठेव सुरू करण्याचा निर्णय घेऊन तिघी प्रतिनिधी देखील नेमण्यात आला. पिग्मी च्या माध्यमातून रोग पैसा संस्थेत येऊ लागला संस्थेचा नफा हा कर्ज वितरणावर अवलंबून असतो त्यामुळे कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला सुरुवातीला कर्जाची मर्यादा १०००० ठरविण्यात आली आणि कर्जाचा व्याजदर १७ टक्के करविण्यात आला असल्याने लोक कर्ज घेण्यासाठी येत नसत परंतु संस्था खर्च भागविण्यासाठी गरज नसताना देखील काही संचालकांनी स्वतः कर्ज घेतली आणि मिळणाऱ्या व्याजातून संस्थेचे खर्च भागू लागले महिलांनी विशेषतः विधवा महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता विशेष कर्ज योजना ६ टक्के व्याज दराने सुरू करण्यात आली या योजनेचा महिलांना बराच लाभ झाला दि. ३१.०३.१९९५ अखेर म्हणजे अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत संस्थेचे खेळते भांडवल रू.३,५०,०००/- पर्यंत गेले आणि निव्वळ नफा रु. ६९९.८५ एवढा झाला ही बाब सर्वांनाच अत्यंत आनंदाची होती . आता संस्थेचे नाव सावंतवाडीत प्रसिद्ध झाले होते इतर समाजामध्ये संस्थेचे नावलौकिक वाढले होते व त्यामुळे ख्रिस्ती व इतर समाजातील लोकांना व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हळूहळू संस्था बाळसे धरू लागली. आता मात्र इतर तालुक्यातील लोकांकडून संस्थेच्या शाखेची मागणी होऊ लागली आणि १९९७ रोजी संस्थेचे कार्यक्षेत्र सावंतवाडी , वेंगुर्ला आणि कुडाळ तालुका करण्यात आले. सन १९९९ मध्ये वेंगुर्ला तर २००० मध्ये शिरोडा येथे अशा दोन शाखा उघडण्यात आल्या. अवघ्या ५ वर्षाच्या कालावधीत संस्थेने एक कोटी खेळत्या भांडवलाचा टप्पा पार केला. दरम्यान जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पतपुरवठा करणाऱ्या बऱ्याचशा संस्था बुडू लागल्या होत्या परंतु कॅथलिक पतसंस्थेचा आलेख वाढतच होता. त्यामुळे ठेवीदार, कर्जदार यांचा संस्थेवरील विश्वास अधिकच दृढ होत गेला आणि संस्था ख्रिस्ती इतर धर्मीय तसेच परप्रांतीय लोकांच्या विश्वासाचे व आदराचे स्थान बनलीआणि खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम असे स्वरूप प्राप्त झाले. आता दिवसागणिक संस्थेचे व्यवहार व सभासद संख्या वाढू लागल्यामुळे चर्चा आवारातील एका खोलीची जागा अपुरी पडू लागली त्यामुळे २००० साली संस्थेची शाखा सावंतवाडी व प्रधान कार्यालय प्रशस्त अशा भाड्याच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. आता मात्र संपूर्ण जिल्ह्याभरातून संस्थेच्या शाखे करिता मागणी होऊ लागली आणि सन २००० मध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा करण्यात आले सन २००१ मध्ये मालवण २००४ मध्ये कणकवली आणि सन २०१८ मध्ये कुडाळ येथे शाखा उघडण्यात आल्या कालावधीमध्ये संस्था नावारुपास आली . संस्थेने वेळोवेळी अनेक बेकार व बेरोजगार युवकांना उद्योग धंद्यासाठी प्रवृत्त करून त्यांना कार्यरूपाने मदतीचा हात पुढे केलेला आहे . सन्मानाने जगण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. 

वेळोवेळी ऑडिट प्रणालीमध्ये वेगवेगळे बदल होऊ नये सुरुवातीपासूनची ऑडिट वर्ग “अ” ची परंपरा २५ वर्षे चालू आहे ती खंडित होऊ दिलेली नाही आजचे युगे टेक्नॉलॉजी युग आहे आजचा तरुण ग्राहक वर्ग नेट बँकिंग ला जास्त पसंती देतो आणि या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सन २०१५ मध्ये CBS प्रणाली सुरू केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात CBS प्रणालीद्वारे काम करणारी कॅथलिक पतसंस्था पहिली व एकमेव संस्था होण्याचा बहुमान मिळवला त्याचप्रमाणे सन २०१६ मध्ये संस्थेने आपला स्वतःचा मोबाईल Apps व RTGS/NEFT सेवा सुरू करून Net Banking सुविधा पुरविणारी पहिली संस्था ठरली. आज SMS Banking, RTGS/NEFT/Pay Direct Card/ Mobile apps/ Dish TV Recharge/Mobile Recharge/ Ticket Booking यासारख्या सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत व त्यामुळे संस्थेचे व्यवहार देखील वाढले आहेत आज संस्थेचे ग्राहक घर बसल्या व सर्व सुविधा आनंद विधानसभा आनंद घेत आहेत डिसेंबर २०१७ मध्ये सरकारकडून केलेल्या नोटबंदी व कॅशलेस व्यवहारामुळे बऱ्याचशा संस्था आर्थिक अडचणी मध्ये आल्या. परंतु या नोटबंदीस अनुसरून आमच्या संस्थेने घेतलेल्या ठाम निर्णयामुळे संस्थेवर कोणताही परिणाम न होता संस्था डौलाने उभी आहे याचा आम्हाला अभिमान आहे आज सर्वच लोक कॅथलिक पतसंस्था न म्हणता त्यातली बँक म्हणूनच संबोधतात ही अभिमानास्पद बाब आहे काही ऑडिटर नी तर ऑडिट केल्यानंतर कामकाजाची कार्यपद्धती व पारदर्शकता पाहून मिनी बँक म्हणून चेहरा देखील दिला आहे संस्थेच्या आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन पॅन कार्ड सुविधा व वाहन तसेच हेल्थ इन्शुरन्स सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा फायदा ग्राहकांना होत आहे संस्थेचे फक्त नफा कमविणे हे उद्दिष्ट नसून समाजातील लोकांना चांगली सेवा देण्याचे काम करते संस्थेने समाजाशी कायम बांधिलकी ठेवली असून गरजू लोकांना वेळोवेळी मदत करत असते काही गरीब होतकरू मुलांना त्याचा घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च आज संस्था करत आहे तसेच समाजातील समाजकार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आवर्जून सत्कार केला जातो व त्याच्या कार्याला संस्थेकडून आर्थिक मदत दिली जाते . संस्थेने प्रत्येक ग्राहक वर्गाचा विचार करून वेगवेगळ्या ठेव तसेच कर्ज योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लोकांना अडीअडचणीच्या वेळी मदत होण्यासाठी अगदी कमी कागदपत्रांवर त्वरित कर्ज वितरण करणारी ‘इमर्जन्सी कर्ज योजना’ सर्वांना लोकप्रिय ठरली व याचा बरेच ग्राहक फायदा घेत आहेत. संस्थेने आपल्या वसुलीवर कटाक्षाने लक्ष ठेवल्यामुळे आज संस्थेने नेट एन . पी.ए. ०% ठेवण्यात यश मिळविले आहे. संस्थेने आपल्या सभासदांना ‘मेंबर्स डेट फंड’ योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अंत्यविधी खर्चासाठी रु.५०००/- आर्थिक मदत दिली जाते. संस्थेने समाजाशी बांधिलकी ठेवून सन २०१८-२०१९ हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात गावोगावी फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित केले याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला . त्याप्रमाणे तरुण पिढीला त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करून एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि यापुढे देखील संस्थेमार्फत असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

संस्थेच्या चांगल्या कामगिरीबद्दल जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून दखल घेऊन वेगवेगळ्या पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित केले आहे. आज संस्थेने पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अवघ्या २५ वर्षात ठेवी १०० कोटी व १२५ कोटी खेळत्या भांडवलाचा टप्पा पार करणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही एकमेव संस्था ठरली आहे. आज संस्थेच्या शाखांकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यातून मागणी होत आहे आणि समाजाचा विचार करून संस्थेने आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्रात वाढ करून संपूर्ण कोकण विभाग केले आहे. आज संस्थेच्या सर्व सहा शाखा, प्रधान कार्यालय प्रशस्त अशा स्वमालकीच्या जागेत आपल्या ग्राहकांना सेवा पुरवीत आहेत व सातवी शाखा मुंबई येथे उघडण्याकरिता यंत्रणा सज्ज केली आहे . केवळ रु.३५०००/- भांडवलावर सुरू केलेली संस्था आज कोट्यावधींचे व्यवहार पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत आहे. सातत्य, आर्थिक शिस्त, काटेकोर पद्धती , विश्वासहर्ता आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून वेळोवेळी घेतलेले निर्णय याचबरोबर आपल्या ग्राहकांबरोबर स्नेहबंध दृढ केले आहे. अर्थकरणात नवे बदल संस्थेने सहज स्वीकारून यशस्वी केले आहे. संस्था सातत्याने यश शिखरावर राहिलेली आहे. आणि यामध्ये संस्थे ला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास समाजातील समाजकार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आवर्जून सत्कार केला जातो व त्याच्या कार्याला संस्थेकडून आर्थिक मदत दिली जाते . संस्थेने प्रत्येक ग्राहक वर्गाचा विचार करून वेगवेगळ्या ठेव तसेच कर्ज योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लोकांना अडीअडचणीच्या वेळी मदत होण्यासाठी अगदी कमी कागदपत्रांवर त्वरित कर्ज वितरण करणारी ‘इमर्जन्सी कर्ज योजना’ सर्वांना लोकप्रिय ठरली व याचा बरेच ग्राहक फायदा घेत आहेत. संस्थेने आपल्या वसुलीवर कटाक्षाने लक्ष ठेवल्यामुळे आज संस्थेने नेट एन . पी.ए. ०% ठेवण्यात यश मिळविले आहे. संस्थेने आपल्या सभासदांना ‘मेंबर्स डेट फंड’ योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अंत्यविधी खर्चासाठी रु.५०००/- आर्थिक मदत दिली जाते. संस्थेने समाजाशी बांधिलकी ठेवून सन २०१८-२०१९ हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात गावोगावी फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित केले याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला . त्याप्रमाणे तरुण पिढीला त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करून एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि यापुढे देखील संस्थेमार्फत असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्थेच्या चांगल्या कामगिरीबद्दल जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून दखल घेऊन वेगवेगळ्या पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित केले आहे. आज संस्थेने पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अवघ्या २५ वर्षात ठेवी १०० कोटी व १२५ कोटी खेळत्या भांडवलाचा टप्पा पार करणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही एकमेव संस्था ठरली आहे. आज संस्थेच्या शाखांकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यातून मागणी होत आहे आणि समाजाचा विचार करून संस्थेने आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्रात वाढ करून संपूर्ण कोकण विभाग केले आहे. आज संस्थेच्या सर्व सहा शाखा, प्रधान कार्यालय प्रशस्त अशा स्वमालकीच्या जागेत आपल्या ग्राहकांना सेवा पुरवीत आहेत व सातवी शाखा मुंबई येथे उघडण्याकरिता यंत्रणा सज्ज केली आहे . केवळ रु.३५०००/- भांडवलावर सुरू केलेली संस्था आज कोट्यावधींचे व्यवहार पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत आहे. सातत्य, आर्थिक शिस्त, काटेकोर पद्धती , विश्वासहर्ता आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून वेळोवेळी घेतलेले निर्णय याचबरोबर आपल्या ग्राहकांबरोबर स्नेहबंध दृढ केले आहे. अर्थकरणात नवे बदल संस्थेने सहज स्वीकारून यशस्वी केले आहे. संस्था सातत्याने यश शिखरावर राहिलेली आहे. आणि यामध्ये संस्थे ला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे आजी माजी संचालक, सल्लागार, अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी, सर्व निष्ठावान सभासद, ग्राहक, हितचिंतक, सहकार खाते, संस्थेच्या संबंधित बँका, जिल्हा फेडरेशन, प्रचार प्रसार माध्यम यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून संस्थेच्या पुढील वाटचालीस अशीच सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद.

श्री जेम्स झुजे वॉजीस सरव्यवस्थापक

कॅथलिक अर्बन को-आप क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी

History

Catholic Urban Co-operative Credit Society Ltd Sawantwadi. is registered under the Maharashtra Co-operative Society Act 1960. It was established by social reformer army retired Mr.Peter Francis Dantas and was blessed by Late his Lordship Ret. Rev. Bishop Valerian Dsouza, Bishop of Pune dioceses along with parish priest of Sawantwadi Late Rev Fr. John Saldhana on 6th October 1994 at Sawantwadi dist. Sindhudurg in a small room of Our Lady Of Milagris Church Sawantwadi. The main mission was to assist people in society during their financial crisis and to bring a massive change in people’s lifestyles., Catholic Urban Co-operative Credit Society Ltd Sawantwadi which was founded with just Rs. 35000 Share Capital. Now the society has reached upto 200 cr of deposit with its six branches of its own premises all over Sindhudurg district. The society is also providing core banking and net banking facilities to its customers.

Vision

Exceed customers expectations  by making their dreams our priority through serving the community and beyond

Mission

Delight the customers by providing simplified and modernized banking solutions through superior technology and customer relationship

Scroll to Top